'यामुळे' उद्धव ठाकरेंना एनडीएच्या बैठकीचं आमंत्रण नाही; केसरकरांचं स्पष्टीकरण | Deepak Kesarkar on Uddhav Thakceray | NDA Meeting Updates | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deepak Kesarkar on Uddhav Thakceray | NDA Meeting Updates

'यामुळे' उद्धव ठाकरेंना एनडीएच्या बैठकीचं आमंत्रण नाही; केसरकरांचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली - एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आणि पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दीपक केसरकर यांनी आज दिल्लीतून एकनाथ शिंदे गटाची भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रपदीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज एनडीएची दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी एकनाथ शिंदे गटाकडून दीपक केसरकर आज दिल्लीत आहेत. (Deepak Kesarkar news in Marathi)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती पदासाठी आदिवासी समाजातील महिलेला मोठी संधी दिली आहे. देशात अनेक ठिकाणी नक्षल चळवळ फोफावली. त्यांना नेतृत्वाची संधी मिळाली नसल्याने त्यांनी नक्षल चळवळीचा मार्ग निवडला. मात्र आज भारत देशाच्या सर्वोच्च स्थानी आदिवासी महिला जाणार आहे. पंतप्रधान मोदींनी मोठा मॅसेज दिल्याचं म्हणत केसरकर यांनी मोदींच्या निर्णयाचं कौतुक केलं.

आमचा विधीमंडळपक्ष एकत्र आला असून युतीच सरकार महाराष्ट्रात आलं आहे. एनडीए ही देशाच्या पातळीवर झालेली युती असते. ज्यावेळी आमचे खासदार भाजपला पाठिंबा देतील, तेव्हा आम्ही एनडीएचे घटक होऊ. मात्र टेक्निकली आम्ही एनडीएचे घटक झाल्याचं केसरकर यांनी स्पष्ट केलं.

केसरकर म्हणाले की, काही शिवसैनिकांनी मला फोन करून विचारलं की, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित एनडीएच्या बैठकीला उद्धव ठाकरे यांना आमंत्रण का दिलं गेल नाही. मात्र आजपर्यंतचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार मातोश्रीवर गेलेले आहेत. मातोश्रीचा प्रतिनिधी कधीही राष्ट्रपती उमेदवाराच्या मिटींगला गेला नसून हीच मातोश्रीची महती असल्याचे केसरकर यांनी म्हटलं.