घरच्या कार्यक्रमासाठी जायचंय...लवकर सोडा; मंत्री केसरकरांच्या विनंतीने सभागृह आवाक्

Deepak Kesarkar
Deepak Kesarkar esakal

पावसाळी अधिवेशनाचा काल अखेरचा दिवस होता. अनेक नेते सभागृहात महत्त्वाचे मुद्दे मांडत होते. मात्र, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मला घरी एक कार्यक्रम आहे, त्यासाठी मला गेलेच पाहिजे, माझे प्रश्न लवकर घ्या... माझी ९३ ची सूचना मला लवकर टेबल करू द्या... असा तगदा लावाल. केसरकरांची ही भूमिका पाहता राजकीय वर्तुळात त्यांच्या जनतेच्या प्रश्नासंदर्भात गंभीरता कितपत आहे. याची चर्चा रंगली आहे.(Deepak Kesarkar said in the legislative council take my questions quickly)

शिंदे - भाजप युती सरकारच्या पहिल्याच विधिमंडळ अधिवेशनात मंत्री सभागृहात नसल्यामुळे अनेकवेळा विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. मंत्रीमंडळात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह २० कॅबिनेट मंत्री असून एकही राज्यमंत्री नाही. त्यामुळे विधानसभा, विधानपरिषदेतील कामकाजाला सामोरे जाताना मंत्र्यांची चांगलीच तारांबळ झाली.

Deepak Kesarkar
महाराष्ट्रातील मेंढरे घाबरून पळाली; शिंदे गटावर शिवसेनेची टीका

अशातच, काल अधिवेशनाचा अखेरचा दिवस होता. मात्र, केसरकरांना जनतेच्या प्रश्नापेक्षा कौटुंबिक कार्यक्रम महत्त्वाचा होता असे दिसून आले.

मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्याला घरी कार्यक्रम आहे, माझ्या खात्याचे प्रश्न लवकर घ्या अशी विनंती सभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे केली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात शिक्षण विभागाचे प्रश्न होते.

त्यात प्रश्नोत्तराचा तास सुरू होण्यास विलंब झाला. त्यामुळे पहिल्याच प्रश्नाला उत्तर देताना केसरकर म्हणाले की, मला घरी एक कार्यक्रम आहे, माझे प्रश्न लवकर घ्या, माझे आणखी पाच प्रश्न आहेत. मला घरी छोटासा कार्यक्रम आहे, मला त्यासाठी गेले पाहिजे, त्यामुळे मी विनंती करतो पुढचा प्रश्न घ्या.

सभागृहाचे इतर कामकाज सुरु असतानाही केसरकर यांनी मला घरी लवकर जायचे आहे माझी ९३ ची सूचना मला घ्या या विनंतीमुळे सभागृहात कौटुंबिक कार्यक्रम महत्त्वाचा का अशी कुजबूज सुरू झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com