
दिपाली सय्यदचं पंतप्रधान मोदींना पत्र; अमृता फडणवीसांसह भाजपा नेत्यांना...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांवर गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने आक्षेपार्ह टीका होत असल्याचं सांगत शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. अमृता फडणवीसांसह भाजपा नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी सय्यद यांनी या पत्रातून केली आहे.मोदींनी गेल्या २५ वर्षांच्या युतीचा आणि शिवसैनिकांचा विचार करून आपली भूमिका मन की बातममधून स्पष्ट करावी, असंही या पत्रात म्हटलं आहे. (Shivsena leader Deepali Sayyad wrote a letter to PM Narendra Modi)
दिपाली सय्यद (Deepali Sayyad) यांनी याबद्दल ट्विट करत माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्या म्हणतात, भाजप म्हणजे वादग्रस्त विधानांचा कळस म्हणावे लागेल. आदरणीय मोदीजी, नुपूर शर्मा प्रकरणाअगोदर महाराष्ट्रातुन तुमच्या दिल्ली PMO कार्यालयात पोहचवलेल्या पत्राचे उत्तर कधी मिळणार? महाराष्ट्रातील भाजप नेत्यांसाठी न्याय वेगळा करणार का?. या ट्विटसोबत दिपाली सय्यद यांनी या पत्राचा फोटोही शेअर केला आहे.
गेल्या दहा महिन्यांपासून महाराष्ट्रातल्या भाजपा नेत्यांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि त्यांच्या कुटुंबियांवर वारंवार अपशब्द आणि खालच्या पातळीवर होणाऱ्या आक्षेपार्ह विधान केली जात आहेत. भाजपा नेते किरीट सोमय्या, आमदार आशिष शेलार, अमृता फडणवीस , आमदार अतुल भातखळकर चंद्रकांत पाटील आणि भाजपाचा पाठिंबा असलेले नवनी राणा आणि त्यांचे पती वारंवार जाणूनबुजून खालच्या पातळीवरची विधानं करत असल्याचं या पत्रातून सांगण्यात आलं आहे.

Deepali Sayyad Letter
गेल्या २५ वर्षांच्या युतीचा आणि शिवसैनिकांच्या भावनांचा विचार करुन तात्काळ आपली भूमिका सर्व गोष्टींना पाठिंबा देते का हे मन की बात द्वारे आणि पत्राद्वारे स्पष्ट करावं. आपली प्रतिक्रिया महाराष्ट्राच्या सुव्यवस्थेला वेगळं वळण देणारी असेल. आपण यावर प्रतिक्रिया न दिल्यास हे असंच सुरू राहून कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते, असंही दिपाली सय्यद यांनी पत्रात म्हटलं आहे.
Web Title: Deepali Sayyad Shivsena Leader And Actress Letter To Prime Minister Narendra Modi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..