दारू दुकाने, बारला देवदेवतांची नावे देण्यास बंदी; 30 जूनपर्यंत बदलण्यास मुदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bar

सध्या अस्तित्त्वात असलेली नावे बदलण्याकरता ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

दारू दुकाने, बारला देवदेवतांची नावे देण्यास बंदी; 30 जूनपर्यंत बदलण्यास मुदत

राज्यातील अनेक ठिकाणी मद्याची दुकाने, बार यांना देवदेवतांची, राष्ट्रपुरुषांची तसेच गडकिल्ल्यांची नावे दिल्याचे आढळून येते. मात्र राज्यात यापुढे मद्यविक्री दुकाने आणि बार यांना देवदेवतांची, राष्ट्रपुरुषांची, महनीय व्यक्तींची तसेच गड किल्ल्यांची नावे देण्यास राज्य सरकारने बंदी घातली आहे. सध्या अस्तित्त्वात असलेली नावे बदलण्याकरता ३० जूनपर्यंत मद्यविक्री आस्थापने व बार यांना मुदत देण्यात आली आहे.

हेही वाचा: हल्लेखोर कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार नाही; अनिल परबांची माहिती

यासंदर्भात राज्याच्या गृह विभागानं दिलेल्या एका आदेशात म्हटलंय, राज्यातील गडकिल्ल्यांविषयी तसेच राष्ट्रपुरुषांविषयी प्रत्येकाच्या मनात आस्था आहे. त्यामुळे देवदेवता, राष्ट्रपुरुष आणि गडकिल्ले यांच्या नावाचा वापर केल्यास देवदेवता, राष्ट्रपुरुष व गडकिल्ल्यांची विटंबना होते. याशिवाय धार्मिक व सामाजिक भावना दुखावल्या जातात. यामुळे सामाजिक वातावरणही दूषित होते. त्यामुळे राज्यातील मद्य विक्री दुकाने व बार यांना कोणकोणत्या राष्ट्रपुरुषांची व गडकिल्यांची नावे देण्यात येऊ नयेत, असंही या आदेशात सांगितलं आहे. यासंदर्भात गृह विभागाने एक यादी जाहीर केली आहे. त्यात ५६ राष्ट्रपुरुष व महनीय व्यक्तींचा आणि राज्यातील १०५ गडकिल्ल्यांच्या नावांचा समावेश आहे. सध्या मद्यविक्री दुकाने व बार यांना देवदेवतांची, राष्ट्रपुरुषांची व गडकिल्ल्यांची नावे असतील तर ती ३० जूनपर्यंत बदलावीत, अशा सूचना गृह विभागाने दिल्या आहेत.

दरम्यान, राज्यातील गडकिल्ले आणि राष्ट्रपुरुषांचा तसेच सर्वाच्या धार्मिक श्रद्धांचा आदर करणे व सामाजिक सलोखा कायम राखणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. त्यासाठी राज्यात ज्या आस्थापनांमध्ये कोणत्याही प्रकारे मद्यविक्री अथवा मद्यपान सेवा दिली जाते, अशा आस्थापनांस सर्व धर्मीयांच्या देवदेवता, धार्मिक श्रद्धास्थाने, राष्ट्रपुरुष, महनीय व्यक्ती, यांची अशा आस्थापनांना नावे देण्यास मनाई करण्यात आली आहे.

हेही वाचा: Maharashtra Kesari : आर्मी मॅन पृथ्वीराजनं मारलं मैदान; उचलली मानाची गदा

Web Title: Deities For Naming To Bars And Liquor Stores Banned Changing Deadline 30 June

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai NewsAlchoholBar
go to top