
लातूर : दिवंगत पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी त्यांच्या कारकिर्दीत भारताची सेवा केली. विकास साधला. त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मान देण्याची मागणी होत आहे. आजवर ज्यांना-ज्यांना ‘भारतरत्न’ मिळाला, त्याच ताकदीचे मनमोहनसिंग होते. त्यामुळे त्यांना ‘भारतरत्न’ देण्याचा निर्णय केंद्राने घेतला तर तो योग्यच ठरेल,’’ असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले.