Manoj Jarange : ड्रोनद्वारे टेहळणी केल्यानंतर मनोज जरांगेंना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी; सकल मराठा समाजाचा रास्ता रोको

Antarwali Sarati : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यात भाजपला आणि पर्यायाने महायुतीला मोठा फटका बसला. आठपैकी केवळ एका जागेवर महायुतीचा उमेदवार विजयी होऊ शकला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे आणि मनोज जरांगेप पाटील यांनी 'ज्यांना पाडायचं त्यांना पाडा' या आवाहनामुळे भाजपचं नुकसान झालं.
Manoj Jarange
Manoj Jarangeesakal

Maratha Reservation : मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवली सराटी येथील घरी आणि आंदोलनस्थळी ड्रोनद्वारे टेहळणी केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. पाळत ठेवणाऱ्या लोकांचा शोध घेऊन मनोज जरांगे पाटलांना झेड प्लस सुरक्षा द्यावी, अशी मागणी होत आहे.

जरांगे पाटलांना झेड प्लस सुरक्षा देण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजी नगर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात येत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवली सराटी येथील ते राहतात त्या निवासस्थानी आणि आंदोलनाच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी काही अज्ञात ड्रोन द्वारे टेहळणी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Manoj Jarange
Share Market Opening: शेअर बाजाराने रचला नवा इतिहास, सेन्सेक्सने प्रथमच पार केला 80 हजारांचा टप्पा

या प्रकारानंतर जरांगे पाटील यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्यामुळे सकल मराठा समाज चांगलाच आक्रमक झालाय. छत्रपती संभाजी नगर शहरातील केंब्रिज चौकात सकल मराठा समाजातर्फे बुधवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. मनोज जरंगे पाटील यांच्या सुरक्षिततेची काळजी म्हणून त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी आणि त्यांच्यावर पाळत ठेवणाऱ्या लोकांचा शोध घ्यावा या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यात भाजपला आणि पर्यायाने महायुतीला मोठा फटका बसला. आठपैकी केवळ एका जागेवर महायुतीचा उमेदवार विजयी होऊ शकला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे आणि मनोज जरांगेप पाटील यांनी 'ज्यांना पाडायचं त्यांना पाडा' या आवाहनामुळे भाजपचं नुकसान झालं.

Manoj Jarange
Aditya-L1 :इस्रोच्या Aditya-L1 ने केली सूर्यप्रदक्षिणा पूर्ण; सूर्याबद्दल जगाला कळणार ही आश्चर्यकारक माहिती

बीडमध्ये शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांनी भाजपच्या पंकजा मुंडे याचा पराभव केला. त्यामुळे बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भाजपने पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर संधी देण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com