

मुंबई - ‘छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती म्हणजे महाराष्ट्र धर्म जागवावा ही शपथ घेण्याचा दिवस आहे. आपण सर्व जाती धर्माचे लोक एक आहोत, हे आपली शक्ती आहे, आपला संस्कार आहे. या निमित्ताने स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांच्या जीवनावरील ‘छावा’ चित्रपट सरकारने करमुक्त करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
गड -किल्ल्याच्या विषयावर बोलताना सपकाळ म्हणाले की, गड - किल्ले आपल्या अस्मितेचे विषय आहेत, सत्तेत येण्यासाठी लाडकी बहिण योजनेकडे वारेमाप पैसा वळवला जाऊ शकतो तर आपल्याला प्रेरणा देणाऱ्या गड किल्ल्याकडेही पाहावे, त्याचे खासगीकरण करू नये. पर्यटकांच्यासाठी म्हणून गड, किल्ल्यावर बार, पब सुरु करू नयेत असा टोला त्यांनी लगावला.
डान्सबारला विरोध
डान्सबारवरील प्रश्नाला उत्तर देताना सपकाळ म्हणाले, ‘डान्स बारमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. काहींनी शेती विकून डान्सबारमध्ये पैसे उधळले हे पाहूनच डान्सबार बंद करण्याचा धाडसी निर्णय तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी घेतला होता. डान्सबारसारख्या विकृतीला चालना देऊ नये. काँग्रेसचा त्याला विरोध असेल.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.