Ajit Pawar Latest News : 'देवगिरी'वर पुन्हा खलबतं! राष्ट्रवादीचे नेमकं किती आमदार फुटले? अजित पवारांनी बोलवली महत्वाची बैठक

Sharad Pawar Latest News : शरद पवार आज, ३ जुलै रोजी कराड दौऱ्यावर आहेत, तेथे त्यांची जाहीर सभा देखील होणार आहे. तर इकडे अजित पवार यांच्या गोटात हलचालींनी वेग घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निवासस्थान 'देवेगिरी' या बंगल्यावर होणाऱ्या या बैठकीत सर्व समर्थक आमदार एकत्र येणार आहेत.
Deputy CM Ajit Pawar called a meeting of all supporting NCP MLAs at Devagiri Bungalow  Sharad Pawar
Deputy CM Ajit Pawar called a meeting of all supporting NCP MLAs at Devagiri Bungalow Sharad Pawar

Maharashtra Politics Update : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी काल शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. काल अजित पवारा यांच्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक झाली आणि अचानक राजकीय घडामोडींनी वेग घेतला. दरम्यान राजभवनात काल पार पडलेल्या शपतविधीनंतर आज, ३ जुलै रोजी पुन्हा अजित पवार यांनी सर्व समर्थक आमदारांची १० वाजता देवगिरी बंगल्यावर बैठक बोलवली आहे.

शरद पवार आज, ३ जुलै रोजी कराड दौऱ्यावर आहेत, तेथे त्यांची जाहीर सभा देखील होणार आहे. तर इकडे अजित पवार यांच्या गोटात हलचालींनी वेग घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निवासस्थान 'देवेगिरी' या बंगल्यावर होणाऱ्या या बैठकीत सर्व समर्थक आमदार एकत्र येणार आहेत.

Deputy CM Ajit Pawar called a meeting of all supporting NCP MLAs at Devagiri Bungalow  Sharad Pawar
Sharad Pawar : पवारांनी आधीच लावली सोय? बंडाची कुणकुण लागताच राष्ट्रवादीने बदललेली पक्षाची घटना, 'असे' आहेत मोठे बदल

आतापर्यंत अजित पवारांना समर्थन देताना ३५ आमदारांनी सह्या केल्याचं पत्र सादर केलं असल्याची महिती समोर आली आहे. मात्र यानंतर आज एकूण ४२ आमदार अजित पवारांना पाठिंबा दर्शवतील अशी माहिती मिळत आहे. काल झालेल्या शपथविधीबद्दल अनेक आमदारांना कल्पनाच नव्हती. त्यामुळे काल जे गैरहजर राहिले त्यांच्या सह्या आज घेतल्या जाणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सध्या एकूण ५४ आमदार आहेत, यापैकी ४२ आमदार हे अजित पवार याना पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर ४२ आमदार हे अजित पवार यांच्या पाठिशी उभे राहिले तर हा शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

Deputy CM Ajit Pawar called a meeting of all supporting NCP MLAs at Devagiri Bungalow  Sharad Pawar
NCP Sharad Pawar News : तेल लावलेले पैलवान पुन्हा आखाड्यात! आज पवारांची कराडमध्ये जाहीर सभा

अजित पवारांनी काल उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर देवगिरीवर घडामोडींना वेग आला आहे. सकाळपासूनच अजित पवारांच्या भेटीला कार्यकर्ते, आमदार, भाजपचे नेते येत आहेत. यादरम्यान त्यांना समर्थन दिलेल्या आमदारांच्या बैठकीत पुढील वाटचाल कशी असणार आहे यावर चर्चा होणार आहे.

काल ३५ आमदारांनी सह्या केल्याचं पत्र सादर करण्यात आलं होतं. अचानक झालेल्या शपथविधीमुळे काही आमदारांना उपस्थित राहाता आलं नव्हतं. मात्र आज अजित पवारांना ४२ आमदारांचा पाठिंबा मिळेले असे सांगितले जात आहे. दरम्यान अजित पवार आमदारांना काय मार्गदर्शन करणार आणि या बैठकीला कोण-कोण उपस्थित राहतील याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com