
जळगावातील दीड वर्षांचा देवांश हर्षल भावसार हा स्पाइनल मस्क्युलर अट्रॉफी (SMA) टाइप 2 या दुर्मिळ आणि गंभीर आजाराशी झुंज देत आहे. हा आजार त्याच्या स्नायूंना कमजोर करतो, त्याची चालणे, खाणे आणि श्वास घेण्याची क्षमता हळूहळू कमी करतो. या भयंकर आजारावर मात करण्यासाठी एकमेव आशा आहे झोल्गेन्समा ही जीन थेरपी, ज्याचा खर्च तब्बल १६ कोटी रुपये आहे. पण वेळ फार कमी आहे. देवांशला वाचवण्यासाठी केवळ ५ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे.