Devendra Fadanvis : "सर्वांचीच इच्छा असते पण सगळेच मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत"; फडणवीसांचा अजितदादांना चिमटा

devendra fadanvis on ajit pawar statement to become Maharashtra cm maharashtra politics
devendra fadanvis on ajit pawar statement to become Maharashtra cm maharashtra politics Esakal

नागपूर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री होण्याबाबत केलेल्या विधानावरू राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. सकाळ माध्यमसमूहाला दिलेल्या मुलाखतीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून कोणाल मुख्यमंत्री व्हायचं असेल तर त्यात गैर काही नसल्याचे म्हटले आहे.

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजित पवार यांची मुलाखत मी पाहिली नाही. कोणाला मुख्यमंत्री व्हायचे असेल तर यात काही गैर नाही, अनेकांना ते आवडते. पण प्रत्येकजण मुख्यमंत्री होऊ शकत नाही. आम्ही त्यांना (राष्ट्रवादीचे अजित पवार) शुभेच्छा देतो अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

तसेच राज्यातील राजकारणावर बोलताना फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडीत काय चालले आहे हे मला माहीत नाही, मी वारंवार सांगितले आहे की ते स्वतःला 'वज्रमुठ' म्हणवून घेतात पण त्यात अनेक तडे आहेत, ते 'वज्रमुठ' कधीच असू शकत नाहीत.

devendra fadanvis on ajit pawar statement to become Maharashtra cm maharashtra politics
Nokia C300 : नोकिया कमी किमतीत घेऊन येतंय दमदार फोन, जाणून घ्या डिटेल्स
devendra fadanvis on ajit pawar statement to become Maharashtra cm maharashtra politics
Jammu Kashmir Terror Attack : कारगिल युध्दात पिता, मुलाचं पूंछमध्ये बलिदान; आईला म्हणाला होता…

अजित पवार काय म्हणाले होते?

सकाळ माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत, आगामी २०२४ च्या निवडणुकीनंतर माझी मुख्यमंत्रीपदावर दावेदारी ठेवण्याची तयारी आहे. मला १०० टक्के मुख्यमंत्री होण्यास आवडेल, असं अजित पवार म्हणाले होते.

devendra fadanvis on ajit pawar statement to become Maharashtra cm maharashtra politics
अपत्य देव किंवा अल्लाची कृपा नसते, ती…; लोकसंख्येत चीनला मागं सोडल्यावरून अजित पवार म्हणाले आता बास झालं

अजित पवारांना आता २०२४ ला मुख्यमंत्रीपदावर तुम्ही क्लेम करणार का? असा प्रश्न विचारला होता. याला उत्तर देताना पवार म्हणाले की, क्लेम २०२४ ला का? आताच करणार, असं सूचक विधान त्यांनी केलं. त्यांच्या या विधानामुळे एकच हशा पिकला होता. त्यांच्या या विधानानंतर आज राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहे. शिवाय अजित पवारांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चाही रंगल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com