Devendra Fadanvis: छत्रपतींचा अवमान झाल्याचं फडणवीसांना अमान्य; म्हणाले, 'सुधांशू त्रिवेदी...'

Devendra Fadanvis on Bhagat singh koshyari bjp spokesperson sudhanshu trivedi statment on shivaji maharaj
Devendra Fadanvis on Bhagat singh koshyari bjp spokesperson sudhanshu trivedi statment on shivaji maharaj

राज्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचे पडसाद राज्यभर पाहायला मिळत आहेत. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मनसेकडून या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. यामुळे राजकीय वातावरण तापताना दिसत असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवरायांचा अवमान झाला नसल्याचे म्हटले आहे.

राजकीय क्षेत्रातून टीका होत असताना फडणवीस यांनी माध्यमांसमोर येत भूमिका स्पष्ट केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापेक्षा दुसरा कुठलाही आदर्श महाराष्ट्रात आणि देशात असू शकत नाही असे वक्तव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. पुढे ते म्हणाले की, सुधांशु त्रिवेदींचं वक्तव्य मी नीट ऐकलं आहे. कुठल्याही वक्तव्यात त्यांनी महाराजांनी माफी मागितली असं म्हटलेलं नाही.

Devendra Fadanvis on Bhagat singh koshyari bjp spokesperson sudhanshu trivedi statment on shivaji maharaj
Chhatrapati Shivaji Maharaj: कोश्यारींच्या विधानावरून वाद पेटला! आंदोलक अंबादास दानवे पोलिसांच्या ताब्यात

भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानाबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, सुर्य चंद्र आणि तारे असेपर्यंत महाराष्ट्र आणि देशाचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज हेच असतील. त्यामुळे यावरून वाद होण्याची गरज नाही. राज्यपालांच्या मनात देखील हे स्पष्ट आहे की शिवाजी महाराजांपेक्षा मोठा आदर्श असू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा दुसरा अर्थ काढणे बंद झाले पाहीजे, असेही ते म्हणाले.

Devendra Fadanvis on Bhagat singh koshyari bjp spokesperson sudhanshu trivedi statment on shivaji maharaj
IND vs NZ 2nd T20: अजून एक व्हिडिओ गेमवाली खेळी! विराटने सूर्याची खेळी पाहून केले ट्विट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com