मुंबई - भाजप युती सत्तेवर आल्यापासून तीन पक्षात मलईसाठी मारामारी सुरु आहे. सरकारमध्ये गंमत -जंमत सुरु असून दररोज एका मंत्र्यांवर गंभीर आरोप होत आहेत. एखादा निष्णात वकील जसा आरोपीला वाचविण्याचे काम करतो, तेच काम मुख्यमंत्री करत आहे..देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत नसल्याने राज्य पेटले आहे. त्यामुळे फडणवीस यांनी वकिली सोडून मुख्यमंत्रिपदाला न्याय देण्याचे काम करावे, असा सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.पटोले यांनी आज ‘टिळक भवन’ येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, की सरकारमध्ये परिस्थिती भयावह असून सरकारला लाडक्या बहिणीची चिंता नाही. लाडक्या बहिणींचे पती शेतकरीही आहेत आणि हा शेतकरी दररोज आत्महत्या करत आहे..सरकार सोयाबीनला प्रतिक्विंट सहा हजार रुपयांचा भाव देणार होते, पण ३ हजाराचाही भाव मिळत नाही. धान, कांदा, कापसाची स्थितीही अशीच आहे. भावांतर योजना लागू करून फरक देण्याचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले, असा सवाल पटोले यांनी केला.सरकार फक्त जनतेला लुटण्यासाठी सत्तेत आले आहे. भाजप युती सरकारमध्ये ६५ टक्के मंत्री कलंकित आहेत. दररोज महाराष्ट्राची प्रतिमा खराब केली जात आहे. बीड जिल्ह्यातील भ्रष्टाचाराची प्रकरणे दररोज उघड होत असून तीच परिस्थिती पुणे जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतही आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदारच भ्रष्टाचार झाल्याचे उघड सांगत आहेत. मागील अडीच वर्षांपासून हेच सुरु आहे. शेतकऱ्यांच्या योजनेत ४ टक्के भ्रष्टाचार होतो, हे मंत्र्यांनीच सांगितले आहे, याकडे पटोले यांनी लक्ष वेधले..सत्ताधारी पक्षाचा आमदार, चौकशी समिती, पीक विमा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे सांगत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार जर गैरव्यवहार झालाच नाही असे म्हणत असतील तर ते धादांत खोटे बोलत आहेत. त्यांनी खोटे बोलू नये. अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू विसरू नयेत.- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.