इतक्या वर्षांनी शरद पवारांना ब्राम्हण समाजाची आठवण आली; देवेंद्र फडणवीसांचा हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis said After so many years, Sharad Pawar remembered the Brahmin community

इतक्या वर्षांनी शरद पवारांना ब्राह्मण समाजाची आठवण आली, फडणवीसांचा हल्ला

टेंभुर्णी (जि. सोलापूर) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शनिवारी (ता. २१) राज्यातील ब्राम्हण संघटनांची बैठक बोलावली आहे. २० ते २२ संघटनांना शरद पवारांनी निमंत्रण दिले आहे. यावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, ‘इतक्या वर्षांनी शरद पवार यांना ब्राम्हण समाजाची आठवण आली. कोणालाही बैठक बोलावण्याचा अधिकार आहे. कोणत्याही समाजाला बैठक बोलावण्याचा अधिकार आहे. याकडे नकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज नाही’. (Devendra Fadnavis said After so many years, Sharad Pawar remembered the Brahmin community)

शरद पवार (Sharad Pawar) यांचा कार्यक्रम शनिवारी पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात सायंकाळी पाच वाजता पार पडणार आहे. यासाठी अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाबरोबर अनेक ब्राम्हण संघटनांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. २० ते २२ संघटना चर्चेसाठी कार्यक्रमाला उपस्थित राहतील. यावेळी राज्यातील वातावरण निवळण्याचा बैठकीच्या माध्यमातून प्रयत्न होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: शरद पवारांचे ब्राम्हण महासंघाला चर्चेचे निमंत्रण; शनिवारी होणार बैठक

मागील काही दिवसांपासून शरद पवारांविरुद्ध (Sharad Pawar) वातावरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्यावर अनेक आरोप केले. ते ब्राह्मणांचा विरोध करतात, छत्रपती शिवाजी महाराजांचे कधीही नाव घेत नाही, असे अनेक आरोप करण्यात आले. अशात शरद पवार यांनी ब्राम्हण संघटनांची बैठक बोलावली आहे.

या बैठकीवरूनही राजकारण सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्या बैठकीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही शरद पवारांवर हल्ला केला आहे. इतक्या वर्षांनी शरद पवार यांना ब्राम्हण समाजाची आठवण आली. म्हणून त्यांनी बैठक बोलावली आहे. कोणालाही बैठक बोलावण्याचा अधिकार आहे. कोणत्याही समाजाला बैठक बोलावण्याचा अधिकार आहे. याकडे नकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज नाही, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

Web Title: Devendra Fadnavis After So Many Years Sharad Pawar Remembered The Brahmin Community

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top