
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याच्या हिताचे ८ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामधील एका महत्त्वपूर्ण निर्णयात, महाराष्ट्र मंत्रिमंडळाने नवीन गृहनिर्माण धोरणाला मान्यता दिली आहे. प्रत्येकाचे स्वतःचे हक्काचे घर असण्याचे स्वप्न असते. मात्र सातत्याने घरांच्या वाढत्या किंमतीमुळे अनेकांना घर घेणं परवडत नाही. यामुळे राज्य सरकारने जनतेला परवडणारी घरे उपलब्ध व्हावी या उद्देशअंतर्गत ‘माझे घर-माझे अधिकार' हे धोरण सादर केले आहे.