
पुणे : राज्यात २०१४ नंतर सरकार सत्तेत आल्यावर गटशेतीला पुढे नेण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मोठी मदत केली होती. परंतु २०१९ नंतर त्याचे काम काही प्रमाणात थांबले होते. मात्र आता गटशेतीला पुन्हा चालना देण्यासाठी मोठी चळवळ उभी करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दरम्यान कार्यक्रमप्रसंगी फाउंडेशनच्या राज्यस्तरीय चळवळीत सहभागी २५ गटांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची घोषणा या वेळी त्यांनी केली.