CM Devendra FadnavisSakal
महाराष्ट्र बातम्या
CM Devendra Fadnavis : भाजप सदस्य नोंदणी महाअभियानास प्रारंभ; संघटना ही जनता अन् सरकारमधील दुवा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
BJP Organization : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या निवडणूक यशासाठी जनतेचा विश्वास आणि संघटनेच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले. भाजप हा जनतेचा खरा लोकशाही पक्ष असल्याचे ते म्हणाले.
नागपूर : ‘‘भाजप हा जनतेचा लोकतांत्रिक पक्ष आहे. पक्षावरील विश्वासामुळे विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झाले आहे. संघटना आणि जनतेमुळेच सत्ता मिळाली आहे. संघटना ही जनता आणि सरकार यांच्या मधील दुवा म्हणून काम करत असते,’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

