Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निकालांत आपल्याला रेकॉर्डब्रेक जागा मिळतील; फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

राज्यात आज तब्बल 7 हजार 135 ग्रामपंचायतींचा निकाल हाती येणार आहे.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavisesakal
Updated on
Summary

राज्यात आज तब्बल 7 हजार 135 ग्रामपंचायतींचा निकाल हाती येणार आहे.

Gram Panchayat Election Result 2022 : राज्यात आज तब्बल 7 हजार 135 ग्रामपंचायतींचा निकाल हाती येणार आहे. रविवारी या ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. यात सरासरी 74 टक्के मतदान झालं. 34 जिल्ह्यातल्या एकूण 7 हजार 682 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली. काही ठिकाणी बिनविरोध निवड झाल्यानं 7 हजार 135 ग्रामपंचायतीत रविवारी प्रत्यक्ष मतदान झालं.

विशेष म्हणजे, यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह थेट सरपंचपदासाठीही मतदान झालंय. त्यामुळं या ग्रामपंचायतीत कुणाचा झेंडा फडकतो, कुणाच्या नावानं गुलाल उधळला जातो हे बघणं महत्त्वाचं ठरेल. असं असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोमवारी पदाधिकाऱ्यांबरोबर नागपूरमध्ये झालेल्या बैठकीत या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच बाजी मारणार असा विश्वास व्यक्त केलाय.

Devendra Fadnavis
Jammu Kashmir : शोपियानमध्ये दहशतवादी-लष्करांत पुन्हा चकमक; 3 दहशतवादी ठार, परिसरात नाकाबंदी

नागपुरात पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद साधताना फडणवीसांनी भाजपाचाच विजय होईल, असं म्हटलंय. ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आहे. मी आजच तुम्हाल सांगतो, लिहून घ्या तुम्ही की महाराष्ट्रात पुन्हा नंबर वन भारतीय जनता पार्टीच राहील. कोणी काहीही नरेटीव्ह केलं तरी आपल्याला रेकॉर्डब्रेक जागा मिळतील. कोणी काहीही काळजी करु नका, असं फडणवीसांनी सांगत विजयाचा विश्वास व्यक्त केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Legal Action Against Fake Caste Certificates In Maval Raises Questions For Reserved Seats Ahead Of Gram Panchayat Polls
Social activist Sachin Chavan withdrew his indefinite hunger strike after the administration assured in writing that the alleged financial irregularities in Adul Gram Panchayat would be investigated and a report submitted within 15 days
Social activist Sachin Chavan has launched an indefinite hunger strike outside the Adul Gram Panchayat office in Paithan taluka, demanding an impartial inquiry into alleged financial irregularities and action against those found responsible.
uruli kanchan gram panchayat election ncmc smart card camp women voters mahakaleshwar darshan sarpanch candidates pune rural
Marathi News Esakal
www.esakal.com