"ब्राह्मण असल्यानेच फडणवीसांना डावललं"; ब्राह्मण महासंघाचा भाजपवर आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Eknath Shinde

"ब्राह्मण असल्यानेच फडणवीसांना डावललं"; ब्राह्मण महासंघाचा भाजपवर आरोप

मुंबई : काल महाराष्ट्राच्या नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. पण भाजपकडे बहुमत असतानाही भाजपने मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना दिलं त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. त्याचबरोबर ब्राम्हण महासंघाने भाजपच्या नेतृत्वावर टीका केली आहे. फडणवीस हे ब्राम्हण असल्यामुळे त्यांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही अशी टीका ब्राम्हण महासंघाने केली आहे.

(Deputy CM Devendra Fadnavis)

"राज्यात संपूर्ण बहुमत असून देखील देवेंद्र फडणवीस यांना सत्तेपासून दूर ठेवलं गेलं." असा आरोप ब्राह्मण महसंघाचे अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी केला आहे. भाजप जाणून बुजून ब्राह्मण समाजाचं खच्चीकरण करत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. नितीन गडकरी यांच्यासोबत देखील भाजपने मुद्दाम असाच खेळ केला आणि फडणवीस यांच्यासोबतही असाच खेळ केला आहे. फडणवीस केवळ ब्राह्मण असल्यानेच भाजपने त्यांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही असा आरोप केला जात आहे.

राजकीय कौशल्य दाखवत देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाला सत्तेच्या दारापर्यंत आणलं आणि आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत माननीय एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं आणि आपण सरकारला बाहेरून पाठिंबा देणार असल्याचं सांगितलं. पण केंद्रातील नेतृत्वाने त्यांना बळजबरीने उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान व्हायला सांगितलं आणि त्यांच खच्चीकरण केलं आहे. त्यामुळे ब्राह्मण महासंघ भाजपचा तीव्र शब्दांत निषेध करत आहे असं ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा: हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही; उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं

दरम्यान एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यावर १० दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर काल महाराष्ट्राला नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिळाले. आपल्या पदाचा राजीनामा देताना उद्धव ठाकरे यांनी जनतेला भावनिक आवाहन करत निरोप घेतला. जनतेच्या मनातील नाराजी काहीसी कमी व्हावी यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवणार असल्याची घोषणा केली आणि आपण सरकारला बाहेरून पाठिंबा देणार असल्याचं सांगितलं पण नंतर केंद्रीय नेतृत्वाच्या सांगण्यावरून त्यांना उपमुख्यमंत्रीपद स्विकारावं लागलं आहे. त्यामुळे भाजपने त्यांच्यावर खेळी केली अशी टीका भाजपवर झाली होती. त्यानंतर ब्राह्मण महासंघाने देखील भाजपवर जाहीर आरोप केले आहेत.

Web Title: Devendra Fadnavis Bjp Brahman Mahasangha Allegations Bjp

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..