
Devendra Fadnavis : राहुल गांधी सावरकरांच्या केसाऐवढे देखील होऊ शकत नाहीत - देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूर येथे 'मृत्युंजयाचा आत्मयज्ञ' या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर टिका केली. राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्यावर केलेल्या टिकेच्या फडणवीसांनी समाचार घेतला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, राहुल गांधी यांना वीर सावरकरांच्या क्षमतेचा अंदाज येऊ शकत नाही. अत्याचार सहन करताना सावरकर यांनी इतर कैद्यांसाठी देखील संघर्ष केला. हजारो, लोखो देशभक्त तयार करण्याचे काम खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केले.
त्यामुळे राहुल गांधी जन्मात देखील सावरकर होऊ शकत नाहीत. राहुल गांधी सावरकरांच्या केसाऐवढे देखील होऊ शकत नाहीत. त्यामुळे तुम्ही (राहुल गांधी) मी सावरकर नाही हे सत्य बोलता त्याबद्दल मी आभार मानतो, असे फडणवीस म्हणाले.
राहुल गांधी काय म्हणाले होते -
राहुल गांधी सतत वीर सावरकर यांच्यावर टीका करत असतात. त्यांनी नोव्हेंबर महिन्यात भारत जोडो यात्रेत विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत वक्तव्य केले होते.
सावरकरांनी इंग्रजांना मदत केल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला होता. राहुल गांधी म्हणाले, सावरकरांनी इंग्रजांना पत्र लिहिले होते की मला तुमचे सेवक व्हायचे आहे. घाबरून त्यांनी माफीनाम्यावर सही केली होती, असे करून त्यांनी महात्मा गांधी आणि इतर नेत्यांचा विश्वासघात केला होता.