Devendra Fadnavis I ज्यांचे विचार SC ने कचऱ्यात फेकायला लावले त्यांच्याबद्दल विचारू नका; फडणवीसांची टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Politics

'...अश्या व्यक्तीबद्दल मला प्रश्न विचारून तुम्ही माझा वेळ खराब करू नका

'ज्यांचे विचार SC ने कचऱ्यात फेकायला लावले त्यांच्याबद्दल विचारू नका'

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या बऱ्याच घटना घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर सातत्याने आरोपप्रत्यारोप करत आहेत. दरम्यान, भाजपा आणि महाविकास आघाडीतील टोलेबाजी सुरु असताना आज पुन्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. आज गोव्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी राऊतांना टोला लगावला आहे.

भाजपाने (BJP) त्यांच्या सोशल मीडियावर यासंदर्भातील फडणवीस यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात फडणवी म्हणालेत, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विचारांना, सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) कचऱ्याच्या डब्ब्यात फेकायला सांगितलं आहे. अश्या व्यक्तीबद्दल मला प्रश्न विचारून तुम्ही माझा वेळ खराब करू नका, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. आता फडणवीस यांच्या या टीकेवर राऊत काय उत्तर देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात दावे, प्रतिदावे सुरु आहे. आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी दुसऱ्यांदा गोवा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. यासाठी भाजपाच्या सर्व दिग्गजांनी उपस्थिती लावली आहे. दरम्यान, यानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता आता ट्विटमुळे हा संघर्ष भाजपा आणि आघाडी सरकारमधील वाद आणखी टोकाला जाणार की कुणी माघार घेणार हे पाहणे औत्सुकत्याचे ठरणार आहे.

Web Title: Devendra Fadnavis Criticized To Sanjay Raut On Supreme Court Do Not Statement

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top