Devendra Fadnavis: ''खरं स्वातंत्र्य मिळालंच नाही...'' गृहमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांनी महिला अत्याचाराविरोधात उठवला आवाज

Crime News: ''भारताचा नागरिक म्हणवून घेताना अशा चुकीच्या गोष्टी का घडतात? आपल्याला अद्याप स्वातंत्र्य मिळालेले नाही. निर्भया प्रकरणाला 12 वर्षे झाली, पण तरीही वर्तनात बदल झालेला नाही. सुधारणा नाही आणि आशाही नाहीत.. गुन्ह्यांची तीव्रता कमी व्हायला हवी होती ती शंभरपटीने वाढली आहे.''
Divija Fadnavis
Divija Fadnavisesakal
Updated on

Divija Fadnavis Instagram: मागच्या काही दिवसांपासून राज्यासह देशामध्ये महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. माणसाला आतून बाहेरुन हादरवून सोडणाऱ्या या घटनांमुळे संतापाची लाट निर्माण झाली आहे. याच अनुषंगाने राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलगी दिविजा फडणवीस यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्या दिवशी स्त्रीला मोकळेपणाने वावरता येईल, तोच दिवस एकविसाच्या शतकातला खरा स्वातंत्र्यदिन असेल, असं त्या पोस्टमध्ये म्हणतात.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये दिविजा म्हणतात, कोलकाता, पश्चिम बंगाल आणि नवी मुंबईतली यशश्री... या घटनांमुळे मी अत्यंत दुःखी झाली आहे. एकविसाव्या शतकात स्त्रियांची स्थिती अशी आहे. आज स्वातंत्र्यदिन आहे, पण तो नाममात्र वाटतो. महिला कधी सुरक्षित होणार? त्यांना मोकळेपणाने कधी फिरता येणार? ज्या दिवशी स्त्रीला हक्काने मोकळा श्वात घेता येईल, तोच दिवस खरा स्वातंत्र्याचा दिवस असेल.

दिविजा फडणवीस यांची पोस्ट

कोलकाता प्रकरण: 31 वर्षीय तरुणीच्या अंगावर सर्वत्र जखमा आढळून आल्या. तिच्या डोळ्यात काचा होत्या, हातापायाची हाडे तुटलेली होती.. तिच्यात 150 ग्रॅम वीर्य होते पण एकटा पुरुष फक्त 15 ग्रॅम वीर्य रिलीज करु शकतो. हा प्रकार घडला तेव्हा मृत तरुणी झोपली होती, त्यामुळे आरोपींचा फायदा झाला, असे एका नवीन अहवालात नमूद करण्यात आले आहे. तिचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

नवी मुंबई प्रकरण : नवी मुंबईतल्या उरण परिसरात 26 जुलै रोजी यशश्री शिंदे नावाच्या 20 वर्षीय हिंदू मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. यशश्रीचा मृतदेह विचित्र अवस्थेत आढळून आला होता. तिचा चेहरा ओळखता येत नव्हता, हाडे तुटलेली होती, शरीरावर अनेक जखमा होत्या, आरोपी दाऊद शेख पाच दिवस पोलिसांपासून पळत होता पण शेवटी त्याच्या गावी गुलबर्गा, कर्नाटक येथे पकडला गेला.

दिविजा पुढे म्हणतात, भारताचा नागरिक म्हणवून घेताना अशा चुकीच्या गोष्टी का घडतात? आपल्याला अद्याप स्वातंत्र्य मिळालेले नाही. निर्भया प्रकरणाला 12 वर्षे झाली, पण तरीही वर्तनात बदल झालेला नाही. सुधारणा नाही आणि आशाही नाहीत.. गुन्ह्यांची तीव्रता कमी व्हायला हवी होती ती शंभरपटीने वाढली आहे.

एक तरुण मुलगी म्हणून माझ्या बहिणींच्या सुरक्षिततेची आशा बाळगणे चुकीचे आहे? पुरुषांना स्वतःवर नियंत्रण ठेवणे इतके अवघड आहे का? पुढच्या वर्षी खरा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी आज आपण एकत्र प्रयत्न करण्याची वेळ आली आहे.. जिथे कोणत्याही स्त्रीला तिच्या सुरक्षेची भीती वाटत नाही, जिथे कोणीही पुरुष स्त्रीला त्रास देत नाही आणि जिथे भारताची बंधुता आणि एकता या अशा प्रकारांविरोधात आवाज उठवते.. असा स्वातंत्र्यदिन आपल्याला साजरा करायचा आहे. अशी पोस्ट दिविजा फडणवीस यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com