फडणवीस पोलिसांच्या ताब्यात; मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक

आझाद मैदानवर नवाब मलिक राजीनाम्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर भाजपचा मोर्चा.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisTeam eSakal

नवाब मलिकांवर ईडीची कारवाई झाल्यानंतर ते तुरुंगात आहेत. त्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे (BJP) कार्यकर्ते आक्रमक झाले असून आज आझाद मैदानावरून विराट मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यानंतर ते कार्यकर्त्यांसह मेट्रो सिनेमापर्यंत मोर्चा घेऊन जात असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Devendra Fadnavis
परमबीर सिंहांना दिलासा; सुप्रीम कोर्टाने वाढवली अटकेपासून संरक्षणाची मुदत

आझाद मैदानवर उपस्थितांना संबोधित करताना फडणवीस म्हणाले की, हा संघर्ष देशद्रोह्यांच्याविरोधात आहे. पाकिस्तानी लोकांसोबत मिळून काम करत असलेल्या लोकांविरोधात हा संघर्ष आहे. मलिकांनी बॉम्बस्फोटांच्या आरोपीकडून जमीन विकत घेतली. पण, त्यांचा राजीनामा अजून घेतला नाही. ही घटना राज्यासाठी लाजीरवाणी आहे. सरदार शाहवली खान याने याकूब मेमनसोबत बसून बॉम्बस्फोटाचं प्रशिक्षण घेतलं. त्याने बॉम्बस्फोट घडवून आणला. तो आजही तुरुंगात आहे. दाऊदची बहीण हसीना पारकरचा फ्रंट मॅन हा सलीम पटेल या दोघांनी मिळून हे षडयंत्र रचलं. एका बाईची जमीन हडपली. त्यांनी ही जमीन सॉलिडस इंफ्रास्ट्रक्चरला विकली. ही कंपनी नवाब मलिकांची आहे. बॉम्बस्फोटातील आरोपी जे तुरुंगात आहेत त्यांच्याकडून तुम्ही कवडीमोल भावात विकत घेतली. तरीही शरद पवार आणि उद्धव ठाकरे त्यांचा राजीनामा घेत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis
'बाळासाहेबांना सांगू, तुमचा सुपूत्र...', फडणवीसांचं ठाकरेंना भावनिक आवाहन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com