Bhagatsingh Koshyari | राज्यपालांचं वक्तव्य म्हणजे अतिशयोक्ती अलंकार - देवेंद्र फडणवीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis Bhagat singh Koshyari
राज्यपालांचं वक्तव्य म्हणजे अतिशयोक्ती अलंकार - देवेंद्र फडणवीस

राज्यपालांचं वक्तव्य म्हणजे अतिशयोक्ती अलंकार - देवेंद्र फडणवीस

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याने राज्यभरात मोठा गदारोळ माजला आहे. विविध क्षेत्रांतून त्यांच्या या विधानाचा निषेध करण्यात येत आहे. मुंबईतून गुजराती, राजस्थानी निघून गेले, तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असं विधान कोश्यारी यांनी केलं होतं. या विधानाशी आपण सहमत नसल्याची भूमिका भाजपाने घेतलेली दिसून येते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विधानावर आता स्पष्टीकरण दिलं आहे.

माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी आपण कोश्यारींच्या विधानाशी सहमत नसल्याचं सांगितलं आहे. तसंच राज्यपालांचं विधान म्हणजे अतिशयोक्ती अलंकार असंही ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही. महाराष्ट्राच्या विकासात आणि वाटचालीत मराठी माणसाचं कार्य, त्याचं श्रेय हे सर्वाधिक आहे. उद्योग क्षेत्रामध्ये मराठी माणसाने जी प्रगती केली, त्यामुळे त्याचं जगभरात नाव झालंय. विविध समाजांचं योगदान नाकारता येणार नाही. पण मुंबई आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीत मराठी माणूस, मराठी उद्योजक, मराठी साहित्यिक यांचा सहभाग सर्वाधिक आहे.

राज्यपालांचं विधान अतिशयोक्ती अलंकार असल्याचं सांगताना फडणवीस म्हणाले की, एखाद्या समाजाच्या कार्यक्रमात बऱ्याचदा अतिशयोक्ती अलंकार वापरला जातो. त्याप्रमाणे राज्यपाल बोलले असतील. पण आम्ही त्यांच्या त्या विधानाशी सहमत नाही. महाराष्ट्र आणि मुंबईच्या विकासात जडणघडणीत मराठी माणसाचा सहभाग मोठा आहे.

महाराष्ट्राच्या, मुंबईच्या इतिहासाला कुणीही कुठल्याही पदावरुन नख लावण्याचा प्रयत्न करू नये - आशिष शेलार

तर भाजपा नेते आशिष शेलार यांनीही राज्यपालांच्या या विधानाशी आपण सहमत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. आशिष शेलार आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात की, राज्यपाल महोदयांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाही. महाराष्ट्र आणि मुंबई मराठी माणसाच्या परिश्रमातून, घामातून आणि हौतात्म्यातून उभी राहीली आहे. आमचा तेजस्वी इतिहास पानोपानी हेच सांगतो. त्याला कुणीही कुठल्याही पदावरून नख लावण्याचा प्रयत्न करु नये.

Web Title: Devendra Fadnavis Dycm On Governor Bhagatsingh Koshyari Controversial Statement

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top