
मुंबई - ‘महाराष्ट्र सरकारने दावोस येथे २९ कंपन्यांसोबत गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केले. यातील फक्त एक कंपनी परदेशातील असून उर्वरित २८ कंपन्या भारतीय आहेत. २८ पैकी २० कंपन्या महाराष्ट्रातील असताना गुंतवणुकीचे सामंजस्य करार दावोसला करण्याची गरज काय?,’ असा सवाल करत विरोधी पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावर टीकास्त्र सोडले.