भ्रष्टाचाराचा डाग नसलेला विकासाचा महामेरू देवेंद्र फडणवीस : राम सातपुते

उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा शुक्रवारी (ता. २२) वाढदिवस! राज्याच्या राजकारणातला सध्याचा सर्वात ताकदवान आणि श्रेष्ठ नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला दोनदा सिद्ध केले. त्यांच्या माध्यमातून राज्याची भरभराट होईल, असा विश्वास आमदार राम सातपुते यांनी व्यक्त केला.
devendra fadanvis ram satpute
devendra fadanvis ram satputesakal

सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा शुक्रवारी (ता. २२) वाढदिवस! राज्याच्या राजकारणातला सध्याचा सर्वात ताकदवान आणि श्रेष्ठ नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला दोनदा सिद्ध केले. त्यांच्या माध्यमातून राज्याची भरभराट होईल, असा विश्वास आमदार राम सातपुते यांनी व्यक्त केला.

वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना मला भावलेले देवेंद्रजींचे विविध पैलू आहेत. कार्यकर्ता कसा जपावा आणि कार्यकर्ता कसा मोठा करावा, हे या लोकनेत्याने केले. माझ्यासारखा सामान्य युवक ज्याच्या पिढ्यान्‌पिढ्यांचा राजकारणाच्या दूरदूरपर्यंत सबंध नाही. घरात कोणीही साधा ग्रामपंचायत सदस्यही नव्हता. त्या घरातल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बळ दिले आणि विश्वास टाकला म्हणून मी आमदार म्हणून राज्याच्या सर्वोच्च सभागृहात जाऊ शकलो हे देवेंद्रजींमुळेच! देवेंद्र फडणवीस यांची काम करण्याची पद्धत, निर्णयक्षमता, धडाडी, चिकाटी, संयमीपणा, पारदर्शकता, कार्यतत्परता, संवेदनशीलता अन्‌ चाणाक्षपणातून दोन दशकाहून अधिक काळ राज्याच्या पटलावर देवेंद्र फडणवीस हे नाव झळकत आहे. माणूस राजकारणात सर्वोच्च भूमिका निभावत असला, तरी अंगाला एकही भ्रष्टाचाराचा डाग न लागू देता काम करू शकतो हे सत्यात उतरवून दाखवणारे फडणवीस एक व्यक्तिमत्त्व आहेत.

नवयुवकांसाठी प्रेरणादायी नेतृत्त्व

खरंतर, साधारण २०१३ मध्ये एका कार्यक्रमात माझी अन देवेंद्र फणवीस यांची फक्त तोंडओळख झाली होती. त्यानंतर काही वर्षे झाले, मात्र इतक्या वर्षांनी माझ्यातला कार्यकर्ता त्यांनी हेरला आणि काही वर्षांनी मला संधी दिली. माझ्या राजकीय आयुष्याची सुरुवात करताना मी जेव्हा देवेंद्र फडणवीसांना भेटलो, तेव्हा त्यांनी माझा हात हातात घेऊन सांगितलं, "आता राजकारणात येतोय, आरोप, टीका हे सगळं होईल, मात्र यातून ठोस पावलांनी शेवटच्या माणसाला डोळ्यांसमोर ठेवून निर्भीड अन संयमी चालत रहा." आणि त्याचवेळी मला त्यांनी गीता भेट दिली. पाठीवर शाबासकीची थाप टाकली अन सांगितलं, "राम, आता तुला कामाला लागायचं आहे, ज्या ज्यावेळी अडचणी येतील, संकटं येतील त्यावेळी ही गीता तुझ्या कामाला येईल. त्यातील एक जरी अध्याय वाचशील तर पुन्हा नव्याने काम करायला प्रेरणा मिळेल, आता माघारी पाहू नको."

एका मेसेजवर युक्रेनमधील युवकाला मदत

मुख्यमंत्री म्हणून काम करतांना त्यांनी राज्यातला एकही माणूस उपचाराविना राहिला नाही पाहिजे, असा आदेश देत सरकारी तिजोरी गरिबांच्या उपचारासाठी खुली केली. मराठा आरक्षणाचा विषय असो, अनाथांना एक टक्का आरक्षण असो, जलयुक्त शिवार, शेतकरी कर्जमाफी असो अशा कित्येक योजनांनी महाराष्ट्र सुजलाम सुफलाम केला. राज्याच्या विकासासाठी झोकून देऊन काम करणारे कार्यसम्राट आणि पारदर्शक नेते म्हणून त्यांच्याकडे अवघा महाराष्ट्र पाहतोय. युक्रेन-रशिया युद्ध सुरू झाल्यानंतर एक विद्यार्थी तेथे अडकला होता. त्याच्या मदतीसाठी मी फडणवीसांना मध्यरात्री एक मेसेज केला. त्याची तातडीने दखल घेत त्यांनी त्या मुलाशी संपर्क साधत त्याला मदत करीत सुखरूप भारतात आणले.

विरोधी पक्षनेते म्हणूनही लोकांमध्ये राहिले

राजकीय दगाफटका करून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतरही त्यांनी शेतकरी व पूरग्रस्तांचे विषय, वीज तोडणी, ओबीसी राजकीय आरक्षण आणि इतर प्रश्नांवर सरकारला सभागृहात धारेवर तर धरले. आताच ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाले, त्यामागे त्यांचे अभ्यासू धोरणच आहे. कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती भयावह झाली, तेव्हा राज्य सरकार ठोस पावले उचलत नव्हते. त्यावेळी लोकांना धीर व आधार देण्यासाठी विरोधी पक्षनेते म्हणून ते पायाला भिंगरी लावून राज्यभरात फिरले. प्रत्येक कोव्हिड केअर सेंटरवर जाऊन उपचाराचा आढावा घेतला. स्वतःला कोरोना झाला, तेव्हा त्यांनी मोठ्या रुग्णालयात न जाता सर्वसामान्य उपचार घेतात त्याच सरकारी रुग्णालयातून उपचार घेतले.

त्याग व समर्पित वृत्तीतून उपमुख्यमंत्री झाले

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर त्याग आणि समर्पित वृत्ती जपणारे फडणवीस देशाने पाहिले. राज्यात आपले सरकार आले, मात्र ही लढाई विचारांची आणि तत्वांची आहे म्हणत स्वतःच्या वाट्याचे मुख्यमंत्रीपद मित्रपक्षाला देऊन स्वत: उपमुख्यमंत्री झाले. ज्या पक्षाने मला सर्वोच्च पद दिले, त्या पक्षाने दिलेला आदेश मला शिरसावंद्य आहे, मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्याचे पालन करतोय, असेही त्यावेळी ते म्हणाले. त्यातून त्यांची पक्षाबद्दलची निष्ठा आणि त्याग दिसला. त्यांच्या याच सहजवृत्तीमुळे ते लाखो कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान आहेत. सत्तांतरानंतर पुन्हा एकदा राज्यात विकासाची घोडदौड सुरू झाली आहे. येणाऱ्या काळातही तुमच्या दूरदृष्टीने, अभ्यासाने अन्‌ ठोस कृतीने महाराष्ट्र पुन्हा भरभराटीला येईल हा विश्वास भाजपचे माळशिरस विधानसभा मतदासंघाचे आमदार राम सातपुते यांनी फडणवीस यांच्या वाढदिनानिमित्त व्यक्त केला आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com