'वज्रमूठ सभा म्हणजे निराश लोकांचा कार्यक्रम'; मविआच्या सभेवर फडणवीसांचा टोला | Devendra Fadnavis

काल महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा मुंबईतील बीकेसी मैदानावर पार पडली.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSakal

गडचिरोली : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस खरीप पिक लागवडी संदर्भातल्या बैठकीसाठी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवर टीका केली आहे. महाविकास आघाडीची कालची सभा म्हणजे निराश लोकांचा कार्यक्रम होता अशी बोचरी टीका फडणवीसांनी केली आहे.

"त्यांची सत्ता गेल्यामुळे ते निराशही आहेत, बावचळलेले देखील आहेत आणि तोल गेलेले देखील आहेत. त्यामुळे अशा लोकांनी बोललेलं किती सिरियस घ्यावं त्याचा विचार आपण केला पाहिजे. ते सत्तेत असताना त्यांनी काहीच विकास कामे केली नाहीत आणि ते आता विकास कामावर बोलत आहेत. त्यामुळे त्यांना आम्ही गांभीर्याने घेत नाहीत" असं फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis
'संतोष बांगर दादुड्या मिशा कधी काढतोय?' आयोध्या पौळ यांचा बांगरांना चिमटा | Video Viral

हे बोलणारे लोकं आहेत. बोलणारे लोकं आहेत. त्यांनी १ रूपयांत उपचार देण्याची घोषणा केली होती पण आपला दवाखाना नावाची योजना आम्ही सुरू केली असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

Devendra Fadnavis
Rohini Court Shootout: खळबळजनक! गँगस्टर टिल्लू ताजपुरियाची तिहार तुरुंगात हत्या, रोहिणी कोर्ट गोळीबारात होता आरोपी

रिफायनरीला समर्थन देणारे लोकं जास्त आहेत. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न अनेकजण करत आहेत पण जनतेला लक्षात आलं आहे की हे दुट्टपी आहेत. त्यांनीच आधी पत्र पाठवलं आणि तेच आता विरोध करतात. त्यामुळे त्यांचा खरा चेहरा आता समोर आला आहे असं फडणवीस माध्यमांना बोलताना म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com