भावना गवळींकडून फडणवीसांचं कौतुक; म्हणाल्या, राजकारणात... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bhavana gawali_devendra fadnavis

भावना गवळींकडून फडणवीसांचं कौतुक; म्हणाल्या, राजकारणात...

वाशिम : शिवसेनेच्या बंडखोर खासदार भावना गवळी यांनी वाशिममध्ये आज जाहीर सभा घेत शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांचं कौतुकही केलं. फडणवीसांच राजकारण आणि समाजकारणात वेगळं स्थान आहे, असं त्या म्हणाल्या. (Devendra Fadnavis praised by MP Bhavna Gawli She said in politics and Scocial work he has special status)

हेही वाचा: Patra Chawl case : स्वप्ना पाटकर यांची पुन्हा ईडी चौकशी; कार्यालयात दाखल

कार्यकर्त्यांशी आणि जनतेशी बोलताना खासदार गवळी म्हणाल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटायला आपण मुंबईला गेलो होतो तेव्हा ते अडीत तास उभं राहून प्रत्येक व्यक्तीला भेटले. नेता कसा असावा तर जनतेतला असाव, सर्वसामान्य माणसाला साथ देणारा असावा, असाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रुपानं महाराष्ट्राला मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस त्यांची साथ देत आहेत. फडणवीसांनी देखील गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्री म्हणून मोठं काम केलं. एवढे मोठे मोर्चे हाताळले, एवढी मोठी काम केली. राजकारणात समाजकारणात त्याचंही एक वेगळचं स्थान आहे.

हेही वाचा: आम्ही गद्दार नाही, आमच्या बापानं शिवसेना उभी केलीए - भावना गवळी

त्यामुळं आपण महाराष्ट्राच्या विकासाची शपथ घेतली असून आपल्याला सर्वांना त्यांची साथ द्यायची आहे. ही साथ मिळेल अशी अपेक्षा आम्हाला आहे. मी जे बोलते ते करतेच. जोपर्यंत ही खुर्ची आहे तोपर्यंत तिचा उपयोग तुमच्यासाठी झाला पाहिजे भावना गवळीसाठी नाही, असंही त्या वेळी म्हणाल्या.

आम्ही शिवसेना सोडलेली नाही - गवळी

आम्ही शिवसेना सोडलेली नाही, आम्ही शिवसेनेत आहोत. उलट आम्ही शिवसेना-भाजप युती अखंड करण्याच काम केलं आहे. शिवसेनेत आता आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. आमच्यासोबत १२ तेरा खासदार बाहेर पडतात. ४० आमदार बाहेर पडतात. याचं चिंतन त्यांनी केलं पाहिजे. मी लढणारीच नव्हे तर लढून जिंकणारी आहे. या मतदारसंघात पुन्हा एकदा भगवा तुमच्या आशीर्वादानं फडकवल्याशिवाय राहणार नाही, असं यावेळी गवळी म्हणाल्या.

Web Title: Devendra Fadnavis Praised By Mp Bhavna Gawli She Said In Politics And Scocial Work He Has Special Status

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..