राज ठाकरेंच्या घराच्या गॅलरीत देवेंद्र फडणवीस! राजकीय चर्चेला उधाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

raj thackeray

राज ठाकरेंच्या घराच्या गॅलरीत देवेंद्र-अमृता फडणवीस! चर्चेला उधाण

मुंबई : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नव्या घरी म्हणजेच शिवतीर्थावर भेट घेतली. ही भेट केवळ एक स्नेहभेट आहे की आणखी काही याबाबत राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

राज ठाकरे व फडणवीस भेट...राजकीय वर्तुळात चर्चा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कृष्णकुंज शेजारी नव्याने बांधलेल्या शीवतीर्थ या निवासस्थानी आज राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. आज मुंबईतील 'शिवतीर्थ' या राज ठाकरेंच्या नव्या बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सहपत्नीक भेट दिली. या भेटानंतरमनसे आणि भाजप युती होणार का? अशी चर्चा होत आहे. तसेच मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस आणि राज ठाकरे भेट महत्वाची मानली जातेय. आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर या दोन्ही नेत्यांच्या भेटीला महत्व दिले जात आहे.

loading image
go to top