पवारांनी राज्य सरकारला सुधरा असा सल्ला दिलाय - फडणवीस

Devendra Fadnavis on Sharad Pawar Wine Statement
Devendra Fadnavis on Sharad Pawar Wine Statemente sakal

मुंबई : राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विकण्याला परवानगी दिली आहे. त्यानतंर भाजपचे (BJP) नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्राला मद्यराष्ट्र होऊ देणार नाही. हा निर्णय सरकारने मागे घ्यावा. त्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NPC Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याबाबत आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) देखील मत मांडले आहे.

Devendra Fadnavis on Sharad Pawar Wine Statement
विरोधामुळे वाईनचा निर्णय बदलल्यास वाईट वाटण्याचं कारण नाही - शरद पवार

''राज्य सरकारची अब्रू चालली आहे. काही मूठभर लोकांच्या फायद्यासाठी निर्णय घ्यावा लागला. शरद पवारांना कुठंतरी वाटलं असेल की वाईन संदर्भातील निर्णय चुकीचा आहे. त्यामुळे त्यांनी एकप्रकारे राज्य सरकारला सल्ला दिला आहे की सुधरा. शहाणपण असेल तर निर्णय मागे घेतील. महाराष्ट्राचं मद्यराष्ट्र होऊ देणार नाही हा भाजपचा संकल्प आहे'', असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

बजेटवरून विरोधकांवर टीका -

पंतप्रधान मोदींनी सोप्या भाषेत बजेट सांगितला आहे. जे लोक बजेट न वाचता टीका करत होते. त्यांना उत्तर मिळाले आहे. देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली. १३-१४ मध्ये जो जीडीपी होता, त्याच्या दुप्पट जीडीपी भारतानं केला आहे. सामान्य माणसांच्या हितासाठी, शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने बजेट आणला आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. या बजेटमुळे विरोधकांची निराशा झाली आहे. बजेटचं स्वागत झालं त्यामुळे विरोध करायचा कशाला? हा प्रश्न विरोधकांसमोर आहे, असं फडणवीस म्हणाले.

ओबीसी आरक्षणाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असताना विधेयक मंजूर करता येईल का? याबाबत खुलासा करा, असं राज्यपालांनी म्हटलं होतं. राज्य सरकारने खुलासा केला. त्यानंतर आता राज्यपालांनी सही केली आहे, असंही फडणवीस म्हणाले.

शरद पवारांनी नेमकं काय म्हटलं? -

राज्यात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या परवानगीबाबतच्या निर्णयाला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर राज्याने तो बदलल्यास त्यात वाईट वाटण्यासारखं काही नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारच्या निर्णयाला भाजपसह काही संघटनांनी विरोध केला आहे या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, 'वाईन आणि इतर जे काही आहे त्यात फरक जाणून घेण्याची भूमिका घेतली पाहिजे. ती भूमिका घेतली नाही आणि त्याला विरोध असेल तर सरकारने या सगळ्या गोष्टीसंदर्भात वेगळा विचार केल्यास माझा त्याला विरोध असण्याचं कारण नाही.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com