Devendra Fadnavis News | "१८५७ च्या युद्धात तात्या टोपे, झाशीच्या राणीसोबत मीही..."; फडणवीसांचा टोला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis
"१८५७ च्या युद्धात तात्या टोपे, झाशीच्या राणीसोबत मीही..."; फडणवीसांचा टोला

"१८५७ च्या युद्धात तात्या टोपे, झाशीच्या राणीसोबत मीही..."; फडणवीसांचा टोला

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर टीका करताना देवेंद्र फडणवीसांनी बाबरी मशिद पडली तेव्हाची आठवण करून दिली. बाबरी पडली तेव्हा आपण तिथेच होतो, शिवसेनेचा एकही नेता तिथे नव्हता अशी टीका फडणवीसांनी केली होती. त्यावरून १८५७ ला सुद्धा फडणवीस होते, अशी टीका केली होती. त्यालाच आता फडणवीसांनी मिश्किल शैलीत उत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले जे मर्सिडीज बेबी आहे, त्यांनी ना संघर्ष पाहिलाय, ना त्यांना संघर्ष करावा लागलाय. त्यामुळे त्यांना कारसेवकांच्या संघर्षाची थट्टा ते उडवूच शकतात. पण आमच्यासारखे हजारो नाही लाखो कारसेवक, कितीही थट्टा उडवली तरी आम्हाला गर्व आहे, की ज्यावेळी बाबरी ढाचा पडला तेव्हा आम्ही तिथे होतो, मी स्वतः तिथे होतो. तेव्हा मी नगरसेवक होतो.

१८५७ च्या संघर्षावेळी उपस्थित असल्याच्या राऊतांच्या टोल्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, "मी हिंदू आहे. त्यामुळे माझा पूर्वजन्मावरही विश्वास आहे आणि पुनर्जन्मावरही विश्वास आहे. त्यामुळे जर मी पूर्वजन्मात असेन तर १८५७ च्या युद्धात झाशीची राणी आणि तात्या टोपेंसोबत मी लढत असेन. आणि तुम्ही असाल तर त्याहीवेळी तुम्ही इंग्रजांशी युती केलेली असेल. कारण आत्ताही तुम्ही अशा लोकांशी युती केली आहे, जे १८५७ ला स्वातंत्र्ययुद्धच मानत नाहीत. जे म्हणतात, ते शिपायांचं बंड होतं. त्यामुळे त्यांना जे बोलायचं ते बोलावं.