"माझ्या वडिलांना दोन वर्ष इंदिराजींनी जेलमध्ये ठेवलं होतं, त्यामुळं…"

devendra fadnavis reply in assembly to Dilip walse patil on after inquiry in phone tapping case
devendra fadnavis reply in assembly to Dilip walse patil on after inquiry in phone tapping case sakal

फोन टॅपिंग प्रकरणी सायबर पोलिसांनी रविवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा त्यांच्या घरी जावून जबाब नोंदवला. त्यानंतर या प्रकरणाचे थेट पडसाद आज विधानसभेतही पाहायला मिळाले, या प्रकरणावर भाजपाने विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला या प्रस्तावाला आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात उत्तर दिले. त्यानंतर देवेंद्र फडणवीसानी त्याला प्रत्युत्तर दिताना प्रश्नावलीतले प्रश्न हे साक्षीदाराकरता होते. काल मला जे प्रश्न विचारले ते आरोपिकरता होते असे म्हटले आहे.

राज्याच्या पोलिस विभागातून परवानगी न घेता फोन टॅपिंग करण्यात आलं. त्यासंदर्भात विरोधी पक्षनेत्यांनी हा प्रश्न सभागृहात मांडला. चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने आधीच समिती नेमली होती. त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात एक गुन्हा दाखल झाला. त्या गुन्ह्याच्या संदर्भातील तपास करण्याचं काम अधिकाऱ्यांचं असते. त्यांनी २४ जणांची चौकशी केली. त्यानुसार फडणवीसांना आधीच प्रश्नावली पाठवली होती. पण, विरोधी पक्षनेत्यांनी उत्तर दिलं नाही. त्यामुळे त्यांना तपास अधिकाऱ्यांनी १६० ची नोटीस पाठवली. त्याचा अर्थ म्हणजे फडणवीसांचा जबाब नोंदवण्यात येणार होता. त्यानुसार त्यांचा काल जबाब नोंदवण्यात आला, असं दिलीप वळसे पाटील यांनी संगितलं.

गृहमंत्री म्हणाले की..

राज्याच्या पोलिस विभागातून परवानगी न घेता फोन टॅपिंग करण्यात आलं. त्यासंदर्भात विरोधी पक्षनेत्यांनी हा प्रश्न सभागृहात मांडला. चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने आधीच समिती नेमली होती. त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात एक गुन्हा दाखल झाला. त्या गुन्ह्याच्या संदर्भातील तपास करण्याचं काम अधिकाऱ्यांचं असते. त्यांनी २४ जणांची चौकशी केली. त्यानुसार फडणवीसांना आधीच प्रश्नावली पाठवली होती. पण, विरोधी पक्षनेत्यांनी उत्तर दिलं नाही. त्यामुळे त्यांना तपास अधिकाऱ्यांनी 160 ची नोटीस पाठवली. त्याचा अर्थ म्हणजे फडणवीसांचा जबाब नोंदवण्यात येणार होता. त्यानुसार त्यांचा काल जबाब नोंदवण्यात आला, असं दिलीप वळसे पाटील यांनी संगितलं.

devendra fadnavis reply in assembly to Dilip walse patil on after inquiry in phone tapping case
मुलानं निवडणुकीत मुख्यमंत्र्यांना पाडलं; सफाई कर्मचारी आई पुन्हा कामावर

मला विचारलेले प्रश्न आरोपीकरीता होते..

यावर देवेंद्र फडणवीस विधानसभेत बोलताना सांगितले की, मला प्रश्नावली पाठवल्यानंतर मी लेखी उत्तर देणार असल्याचे कळवलं होतं, कारण यामध्ये मला विषेशाधिकार वापरायचा नव्हता. प्रश्नवालीतले प्रश्न आणि काल विचारलेले प्रश्न यामध्ये फरक होता. प्रश्नावलीतले प्रश्न हे साक्षीदाराकरता होते. काल मला जे प्रश्न विचारले ते आरोपिकरता होते. जाणीवपूर्वक कोणीतरी प्रश्न बदलून या व्यक्तीला सहआरोपी करता येते का अशा प्रकारचे चार प्रश्न त्यामध्ये होते. मी अतिशय जबाबदारीने वागलो. त्या ट्रान्सस्क्रीप्ट माझ्याकडे होत्या, ज्या संध्याकाळी तुमच्या मंत्र्यांने प्रेसला दिल्या, त्यामधून कोणाची बदणानी होऊ शकते म्हणून ते मी केंद्रीय गृहसचिवांना दिलं” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. कालचे प्रश्न पाहिल्यावर याला काही राजकीय रंग आहे असेही त्यांनी सांगितलं.

devendra fadnavis reply in assembly to Dilip walse patil on after inquiry in phone tapping case
राणे बंधूंविरोधात FIR; नारायण राणे म्हणाले, "टीकेचे खंडन करणे हे.."

फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की “मला अडचण नाही. प्रश्न कुठे आणि कोणी बदलले हे मला माहिती आहे. पण त्याने काही फरक पडत नाही. , कोणताही गुन्हा नसताना माझ्या वडिलांना इंदिरा गांधींनी दोन वर्षे तुरुंगात ठेवले होते कुठलाही गुन्हा नव्हता, माझ्या काकूला आठरा महिने जेलमध्ये ठेवलं होतं. त्यामुळे तुरुगांत जाण्यासाठी घाबरणारे आम्ही नाहीत. ज्यांनी प्रश्नावली बदलली त्यांनी लक्षात घ्यावे की आम्ही भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर लढतच राहणार आहोत. यासंदर्भात कायदेशी लढाई असेल ती लढू.” त्यांनी सांगितलं की, जेलला घाबरणारे आम्ही लोक नाहीत, जनतेकरीता लढणारे आहोत काहीही झालं तरी मी घाबरत नाही, मी भ्रष्टाचार बाहेर काढतच राहणार असे ते म्हणाले.

devendra fadnavis reply in assembly to Dilip walse patil on after inquiry in phone tapping case
बेलारुसमध्ये रशियन सैनिकांच्या प्रेतांचा खच; कुजल्याने येतेय दुर्गंधी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com