Devendra Fadnavis : उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आता माफी मागणार का? कंत्राट भरतीवरून फडणवीसांचा थेट सवाल

कंत्राटी नोकर भरतीवरून राज्यातील सत्ताधारी पक्षांवर विरोधकांकडून टीक केली जात आहे.
Devendra Fadnavis Slam shivsena Udhhav Thackeray NCP Sharad Pawar And Congress Over govt  contractual recruitment
Devendra Fadnavis Slam shivsena Udhhav Thackeray NCP Sharad Pawar And Congress Over govt contractual recruitment

कंत्राटी नोकर भरतीवरून राज्यातील सत्ताधारी पक्षांवर विरोधकांकडून टीक केली जात आहे. या दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारने काढलेला कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करत असल्याची घोषणा आज घेतलेल्या पत्रकार परिषद घेत केली.

महाराष्ट्रात कंत्राटी भरती संदर्भात मोठा गदारोळ केला जातोय. जे याचे दोषी आहेत ज्यांनी हे केलयं तेच जस्ती आवाज करत आहेत. कंत्राटी भरतीचे दोषी कोण हे समोर आले पाहिजे. त्यामुळे यांचे थोबाड बंद होण्यासाठी काही गोष्ट मी तुमच्यापर्यंत पोचवतोय असे फडणवीस म्हणाले आहेत. कंत्राटी भरतीचा पहिला निर्णय १३ मार्ग २००३ साली झाला आणि पहिलीं कंत्राटी भरती शिक्षण विभागात झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकार असताना असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

Devendra Fadnavis Slam shivsena Udhhav Thackeray NCP Sharad Pawar And Congress Over govt  contractual recruitment
Contractual Recruitment: "त्यांचं पाप आमच्या माथी नको"; फडणवीसांनी मांडला कंत्राटी भरतीचा लेखाजोखा, उबाठा सरकारचे जीआर केले रद्द

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली. त्यांच्या पापाचं ओझे आपल्या सरकारने का उचलायचं. त्यामुळे त्या सरकारने काढलेला कंत्राटी भरतीचा जीआर आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण पाप त्यांनी करायचं आणि आमच्या माथ्यावर फोडून त्यांनीच आंदोलन करायचं हे आम्हाला मान्य करायचं नाही.

Devendra Fadnavis Slam shivsena Udhhav Thackeray NCP Sharad Pawar And Congress Over govt  contractual recruitment
Maharashtra News : मंत्रालयात गाडीला प्रवेश नाकारला, शिंदे गटाच्या आमदाराचा गेटवरच राडा

याला अप्रूव्हलच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिलं आहे. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि ज्यांनी याची सुरूवात केली ते काँग्रेस आता महाराष्ट्राची माफी मागणार आहेत का? असा सवाल देखील फडणवीसांनी विचारला आहे.

युवकाची दिशाभूल, तसेच स्वतःचं पाप दुसऱ्या माथी मारल्याबद्दल त्यांनी माफी मागीतली पाहिजे आणि ते माफी मागणार नसतील तर आमच्या पक्षांना त्यांना रोज जनतेत जाऊन उघडं करावं लागेल असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com