राज ठाकरे सत्यच बोलले, महाविकास आघाडीने... - फडणवीस

Devendra Fadnavis Support Raj Thackeray
Devendra Fadnavis Support Raj Thackeraye sakal

नांदेड : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सभा घेतली. यावेळी राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) आणि शरद पवारांवर (Sharad Pawar) जोरदार टीका केली. तसेच राज ठाकरेंनी भाजप आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं होतं. त्यावर आज राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रितिक्रिया दिली. ते नांदेडमध्ये बोलत होते.

Devendra Fadnavis Support Raj Thackeray
अजितदादांची नक्कल करत राज ठाकरे म्हणाले, पळून कुणासोबत गेले? लग्न कुणाबरोबर केलं?

राज ठाकरे भाजपला सर्वात मोठा पक्ष आहे, असं म्हटलं. ते सत्यच आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला. भाजपने शिवसेनेसोबत युती केली. त्यामुळे दोघांना पूर्ण बहुमत मिळालं. पण, त्या बहुमताचा अनादर करून आणि भाजपच्या पाठित खंजीर खूपसून तीन पक्षांची आघाडी झाली. त्यांनी ही सत्ता कपटानं मिळविली, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले? -

उत्तर प्रदेशात भाजपचं सरकार आहे. तिथे विकास होतोय. मोदी सत्तेत आल्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडकडे पाहावं. या तीन राज्यातून सर्वाधिक लोक बाहेर पडतात, असं मी २०१४ मध्ये बोललो होतो. त्यानंतर आता तिथे विकास होताना दिसतोय, असं म्हणत राज ठाकरेंनी योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका -

भाजप हा एक नंबरचा पक्ष, शिवसेना दोन नंबरचा पक्ष, राष्ट्रवादी तीन नंबरचा पक्ष होता. पण, तीन नंबरचा पक्ष एक आणि दोन नंबरच्या पक्षाला फिरवत होता. जनतेनं भाजप आणि शिवसेनेच्या युतीला मतदान केलं होतं. तुम्हाला शरद पवारांसोबत जाण्यासाठी जनतेनं निवडून दिलं नव्हतं, अशा शब्दात राज ठाकरेंनी भाजपचं कौतुक केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com