नवाब मलिकांची बॅटिंग शिवसेना करतेय - देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis
Devendra FadanvisSakal
Summary

भुतो, न भविष्यती असा मोर्चा काढायचा आहे. देशाच्या सुरक्षेशी ज्यांनी खेळ केला त्यांच्या विरोधात हा मोर्चा असेल असं फडणवीस यांनी म्हटलं.

मुंबई - राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पहिल्या दिवसापासून वादळी ठरले आहे. राज्यपालांनी अभिभाषण अर्धवट केल्यानं आधी गोंधळ झाला. त्यानंतर आता नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधक सभागृहात राज्य सरकारला घेरत आहेत. यातच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला मोठा इशारा दिला आहे. न भुतो, न भविष्यती असा मोर्चा काढायचा आहे. देशाच्या सुरक्षेशी ज्यांनी खेळ केला त्यांच्या विरोधात हा मोर्चा असेल असं फडणवीस यांनी म्हटलं.

नवाब मलिक यांना मनी लाँड्रिग प्रकरणी ईडीने अटक केली आहे. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, एलबीएस रोडवरील ३ एकरांची जमिन हसिना पारकर आणि शावली खानला पावर ॲाफ अटर्नी नवाब मलिक यांच्या कंपनीला देतात. मुंबईत ज्यांनी बॅम्ब स्फोट केले त्या लोकांबरोबर यांनी व्यवहार केला. त्यानंतर मुंबईत ३ बॅम्बस्फोट झाले. हे सर्व पैसे थेट हसीना पारकर आणि दाऊदला गेल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला.

Devendra Fadanvis
पिक्चर बघा अन् आरोग्य जपायचं शिका; आरोग्य विभागाचा हटके उपक्रम

ते पुढे म्हणाले की, आज नवाब मलिक यांना महिन्याला १ कोटी रुपये भाडे येत आहे. याचा अर्थ इतके वर्ष ते ही प्रॅापर्टी एंजॉय करत आहेत. सरकार म्हणते दोषी सिद्ध झाले नाही म्हणुन आम्ही राजीनामा घेणार नाही. भुजबळ म्हणातात की, तो कायदा नव्हता तर जज म्हणतात ही केस फीट आहे. नवाब मलिकांची बॅटिंग शिवसेना करतेय असंही फडणवीसांनी म्हटलं.

नवाब मलिक यांच्याविरोधात आंदोलनाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, हा प्रश्न राजकारण्याचा नाही तर देशद्रोह्याच्या विरोधात उभे राहाण्याचा आहे. एखाद्या दिवशी ते हे ही सांगतील की नवाब मलिक आणि दाऊद दोघेही चांगले आहेत. त्यांचा काही दोष नाही. पण तुम्ही मुंबईच्या अपराध्यांना माफ करू नका. या मुद्यावर मुंबईकर रस्त्यावर यायला तयार आहेत. येताना एकटे येवू नका, एक जनसागर विधानभवनावर लोटला पाहीजे असं आवाहनही फडणवीस यांनी यावेळी केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com