
मुंबई, ता. १५ : राज्यातील एससीसाठी २९ राखीव विधानसभा मतदारसंघापैकी २० जागा महायुतीने जिंकल्या. त्यानंतर रविवारी (ता. १५) झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात संजय सावकारे, संजय शिरसाट यांच्या माध्यमातून दलित समाजाला प्रतिनिधित्व मिळाले.
मात्र पाच राखीव जागांवर विजय मिळवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने दलित समाजातील एकाही आमदाराला मंत्रिमंडळात स्थान दिले नाही. उलट संजय बनसोडे यांना यावेळी मंत्रिमंडळातून पक्षाने डच्चू दिला आहे. गेल्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातही दोनच दलित चेहऱ्यांना संधी मिळाली होती.