फडणवीसांचा ठाकरेंना टोला; ‘तुम्ही रामाच्या बाजूचे की रावणाच्या बाजूचे हे आधी सांगा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis and uddhav thackeray

फडणवीसांचा ठाकरेंना टोला; ‘तुम्ही रामाच्या बाजूचे की रावणाच्या बाजूचे हे आधी सांगा’

मुंबई : राणा दाम्पत्य मातोश्रीसमोर हनुमान चालिसा म्हणणार होते. यामुळे त्यांच्यवार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. हनुमान चालिसा करणार असल्याची घोषणा केल्यामुळे ते राज्य उलवून टाकणार होते असा आरोप करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. असे आरोपपत्रात म्हटले आहे. तेव्हा तुम्ही रामाच्या बाजूचे आहात की रावणाच्या बाजूचे आहात हे आधी सांगावे, असा टोला विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना हाणला.

राणा दाम्पत्य हनुमान चालिसा म्हणणाल असल्याचे सांगितल्यामुळे मागील काही दिवसांपासून राज्यातील वातावरण तापले आहे. राणा दाम्पत्याला घेऊन विरोधकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहे. तर सत्ताधाऱ्यांवर विरोधकांकडून विविध आरोप केले जात आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत असताना राजद्रोहाचा व देशद्रोहाचा गुन्हा राणा दाम्पत्यावर दाखल करण्यात आला आहे. त्यांना अद्याप जामीन मिळालेला नाही, असेही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

राणा दाम्पत्याने मातोश्रीसमोर हनुमान चालिसा म्हटल्याने कोणते राज्य उलवून टाकणार होते, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधी सांगावे. महाविकास आघाडी सरकारच्या राज्यात हनुमान चालिसा म्हणणे गुन्हा झाला आहे. यामुळे देशद्रोहाचे व राजद्रोहाचे गुन्हे दाखल केले जातात. राणा दाम्पत्यांनी मला सांगितले असते तर मुख्यमंत्र्यांच्या घरामसोर नव्हे तर माजी मुख्यमंत्र्याच्या (uddhav thackeray) घरासमोर हनुमान चालिसा म्हणण्याची परवानगी दिली असती, असेही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

हनुमान चालिसा म्हटल्याने कोणता देशद्रोह व राजद्रोह होणार होता, हे मुख्यमंत्र्यांनी मला सांगावे. त्यांच्या अशा कृत्यामुळे ते रामाच्या बाजूने आहे की रावणाच्या बाजूने आहे, असा प्रश्न निर्माण होतो. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी (uddhav thackeray) आपण कोणत्या बाजूने आहे हे सांगावे, असेही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.