
शिर्डी : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करता येत नाही म्हणून विरोधकांनी विधानसभा निवडणुकीत अराजकतावादी शक्तींसोबत हातमिळवणी केली. त्यातून ‘व्होट जिहाद’सारखे प्रकार घडले. राष्ट्रीय विचारांच्या शक्तींनी विधानसभा निवडणुकीत अराजकतावादी शक्तींवर मात केली. मात्र त्यांच्या कारवाया थांबलेल्या नाहीत. सामाजिक वीण विस्कटवून दुफळी माजवण्याचा प्रयत्न होतो. तो थांबवावा लागेल. बांगलादेशी घुसखोरांची नावे मतदारयादीत घुसविण्याचे प्रकार सुरू आहेत. मात्र एकही बांगलादेशी घुसखोर महाराष्ट्रात राहणार नाही,’’ असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.