राज्यात पुन्हा देवेंद्रच : शहा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

अमित शहा म्हणाले 
    आमच्या तीन पिढ्यांनी काश्‍मीरसाठी बलिदान दिले
    कलम ३७० चा मुद्दा राजकीय असल्याचे राहुल गांधी म्हणतात, मात्र ते राजकारणात नवीन आहेत
    कलम ३७० हटवल्याने काश्‍मिरींना न्याय मिळाला 
    पंडित नेहरू यांच्या चुकीमुळे पाकव्याप्त काश्‍मीरचा मुद्दा प्रलंबित
    कलम ३७० हटविण्यासाठी विरोध आहे की पाठिंबा आहे, हे शरद पवारांनी स्पष्ट करावे.

मुंबई - ‘कुछ भी हो, कुछ भी ना हो, जीत हमारी पक्की है’, असे सांगत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला अप्रत्यक्षपणे इशारा दिला. महाराष्ट्र आणि हरियानात भाजपच सत्तेत येणार आणि निवडणुकीनंतर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील, अशी घोषणाही त्यांनी या वेळी केला.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर होते. जम्मू-काश्‍मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयावर अमित शहा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. गोरेगावमधील नेस्को संकुलात अमित शहांचा हा कार्यक्रम पार पडला. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते.

अमित शहा आजच्या कार्यक्रमात युतीबाबत सूतोवाच करतात का, याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, शहा यांनी भाषणात युती किंवा शिवसेनेचा उल्लेखही केला नाही.

नेहरूंची चूक
राज्यातील विधानसभा निवडणुकीतही भाजपसाठी कलम ३७० चा मुद्दा महत्त्वाचा असेल, असे सूतोवाच अमित शहा यांनी केले. 

अमित शहा म्हणाले 
    आमच्या तीन पिढ्यांनी काश्‍मीरसाठी बलिदान दिले
    कलम ३७० चा मुद्दा राजकीय असल्याचे राहुल गांधी म्हणतात, मात्र ते राजकारणात नवीन आहेत
    कलम ३७० हटवल्याने काश्‍मिरींना न्याय मिळाला 
    पंडित नेहरू यांच्या चुकीमुळे पाकव्याप्त काश्‍मीरचा मुद्दा प्रलंबित
    कलम ३७० हटविण्यासाठी विरोध आहे की पाठिंबा आहे, हे शरद पवारांनी स्पष्ट करावे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devendra Fadnavis will be the Chief Minister of Maharashtra says Amit Shah