
पाली : अंगारकी संकष्टी चतुर्थीला मंगळवारी (ता.12) अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीत भाविकांनी गर्दी केली होती. श्री. बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पहाटे पासूनच लांब रांगा लागल्या होत्या. पालीत अंदाजे 25 हजार हून अधिक भाविक दाखल झाले होते. श्री. बल्लाळेश्वर मंदिर व गाभाऱ्यात फुलांची सजावट करण्यात आली होती. श्री. बल्लाळेश्वरला देखील आभूषण व वस्त्र परिधान करण्यात आले होते. तसेच मंदिरा बाहेर रांगोळी देखील काढण्यात आली होती. श्री. बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रभरातून व भारतातून भाविक दाखल झाले होते. यामुळे येथे चांगली आर्थिक उलाढाल झाली असून येथील स्थानिक व्यावसायिक सुखावले आहेत.