Tue, Feb 7, 2023

Dhaan Farmer : धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १५ हजार बोनस; मुख्यमंत्र्यांची घोषणा
Published on : 29 December 2022, 11:12 am
मुंबई : धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १५ हजार रुपये बोनस देण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात याची घोषणा केली. (Dhaan Farmer 15 thousand bonus per hectare to paddy farmers CM Eknath Shinde announced)
हेही वाचा: Bhima Koregaon Shaurya Din: 'शौर्य दिना'ला करनी सेनेचा विरोध; प्रकाश आंबेडकरांवर केले गंभीर आरोप
मुख्यमंत्री म्हणाले, धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १५ हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. दोन हेक्टरी प्रोत्साहनपर हा बोनस दिला जात आहे. शासनाच्या या घोषणाचा फायदा ५ लाख शेतकऱ्यांना होणार आहे.