

मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मोठी घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना थेट राजीनामा द्यायला सांगितल्याची माहिती समोर येत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणामुळे मुंडे अडचणीत आले असून त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.