

Santosh Deshmukh Case: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि इतरांच्या अटकेनंतर, राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.