

Anjali Damania: कृषीमंत्री असताना धनंजय मुंडे यांनी त्यांच्या खात्यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यासाठी त्यांनी मंगळवारी सकाळी एक पत्रकार परिषद घेऊन मुंडेंवर आरोप केले होते. त्याला मुंडेंनी उत्तर दिलं. त्या उत्तरांनाही दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी दमानिया यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.