Dhananjay Munde : समर्थकांच्या आनंदावर विरजण; सेलिब्रेशननंतर काही वेळातच गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhananjay Munde
Dhananjay Munde : समर्थकांच्या आनंदावर विरजण; सेलिब्रेशननंतर काही वेळातच गुन्हा दाखल

Dhananjay Munde : समर्थकांच्या आनंदावर विरजण; सेलिब्रेशननंतर काही वेळातच गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. त्यानंतर ते मुंबईमध्ये उपचार घेत होते. या अपघातानंतर मुंडे पहिल्यांदाच परळीत आले, त्यानंतर त्यांचं जोरदार स्वागत झालं आहे. पण परळीकरांच्या या आनंदावर काही तासांतच पाणी पडलं आहे.

धनंजय मुंडेंच्या स्वागतासाठी त्यांच्या समर्थकांकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. तसंच भव्य कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं. रात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम चालला. यामध्ये धनंजय मुंडे यांनी भावनिक भाषणही केलं.

मात्र या कार्यक्रमाला रात्री १० ची वेळ पोलिसांनी ठरवून दिली होती. ही वेळ आयोजकांनी पाळली नाही. त्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजक आणि धनंजय मुंडेंचे समर्थक वाल्मिक कराड यांच्याविरोधात परळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. १० वाजेपर्यंत परवानगी दिलेली असताना मिरवणूक आणि भाषण रात्री बारापर्यंत सुरू होतं. त्यामुळे हा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.