Dhananjay Munde: धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री होणार नाहीत? मोठी बातमी आली समोर
Latest Beed News: एसआयटी’ आणि ‘सीआयडी’च्या चौकशीतून काही निष्पन्न होईपर्यंत मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबत कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याची भूमिका अजित पवार यांनी घेतली आहे.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे कोंडीत सापडले असताना आणि विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरल्याने मुंडे यांनी राजीनामा दिल्याच्या अफवा पसरल्या होत्या.