Sharad Pawar : देवाने भक्ताला मनातून काढून टाकलं पण...; बीडमधील सभेतील टीकेला धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर

Dhananjay Munde Sharad Pawar'
Dhananjay Munde Sharad Pawar'
Updated on

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी पुन्हा पक्ष उभारणीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्या येवला मतदार संघानंतर कृषीमंत्री धनंजय मुंडेंच्या बीड जिल्ह्यात पहिली सभा घेतली. या सभेत शरद पवार गटाकडून धनंजय मुंडेंवर हल्लाबोल करण्यात आला. त्याला धनंजय मुंडे यांनी आज प्रत्युत्तर दिलं.

Dhananjay Munde Sharad Pawar'
Baramati : आपण इंडिया आघाडीत, सुप्रिया सुळेंना ताकद द्या, पण...; ठाकरेंच्या नेत्यांना सूचना

धनंजय मुंडे यांच्याकडून बीडमध्ये शरद पवार यांच्या स्वागताचे बॅनर लावण्याच आले होते. त्याला शरद पवार गटाच्या नेत्यांकडून धनंजय मुंडेवर टीका करण्यात आली होती.

धनंजय मुंडे बीडमधील सभेवर म्हटलं की, लोकशाही आहे. लोकशाहीने सर्वांनाच आपली मते मांडण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे त्या सभेच्या बाबतीत मला काही बोलायचं नाही. शरद पवारांनी फोटो न वापरण्याच्या केलेल्या सूचनांवर मुंडे म्हणाले की, देवाने भक्ताला मनातून काढून टाकले तर भक्ताच्या मनातला देव निघत नाही.

Dhananjay Munde Sharad Pawar'
Bhagvat Karad: छत्रपती संभाजीनगरमधून भागवत कराड लोकसभा लढवणार? केला मोठा दावा

शेतकरी आत्महत्यांवर मुंडे म्हणाले की, आत्महत्या आज होत नसून अनेक दिवसांपासून होतात. खुल्या आभाळाखाली व्यावसाय करणारी शेतकऱ्यांची जात आहे. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना करून शाश्वत शेतीचा आधार देण्याचा प्रयत्न सरकारचा असल्याचं, धनंजय मुंडे यांनी पुसद येथे सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com