
Karuna Munde: मंत्री धनंजय मुंडे यांना कौटुंबिक कोर्टाने दोषी ठरवत पहिल्या पत्नी करुणा मुंडे यांना पोटगी देण्याचे निर्देश दिले आहेत. करुणा यांना महिन्याला दोन लाख रुपये देण्याचं कोर्टाने म्हटलं आहे. त्यांच्यासोबत घरगुती हिंसाचार झाल्याचं कोर्टाने अंशतः मान्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.