"पोटनिवडणुकीत पैसे वाटले असतील तर..." ; धीरज देशमुखांची थेट आयोगाकडे मागणी - Kasba Bypoll Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dhiraj deshmukh

Kasba Bypoll Election : "पोटनिवडणुकीत पैसे वाटले असतील तर..." ; धीरज देशमुखांची थेट आयोगाकडे मागणी

Kasba Bypoll Election : कसबा पोटनिवडणुकीत भाजपने पैसे वाटल्याचा गंभीर आरोप काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी केला आहे. धंगेकर हे कसबा गणपतीसमोर उपोषणाला बसले आहेत. पैसे वाटतानाचे व्हिडीओ देखील रविंद्र धंगेकर यांनी माध्यमांना दाखवले. दरम्यान या प्रकरणावर राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. भाजपने मात्र हे आरोप फेटाळले आहेत. 

या प्रकरणावर काँग्रेस आमदार धीरज देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पोटनिवडणुकीत पैसे वाटले जात असतील तर ते गंभीर आहे. निवडणूक आयोगाने यावर कारवाई करावी, अशी मागणी धीरज देशमुख यांनी केली आहे. 

देशमुख म्हणाले ही अतिशय गंभीर बाब आहे. निवडणूक आयोगाने यामध्ये लक्ष घातले पाहिजे. आयोगाकडे सर्व कारभार असतो. मला खात्री आहे की या देशातील व्यवस्था निवडणूक प्रक्रिया चांगल्या प्रकारे पार पाडतील. पैसे वाटण्याचे सर्व प्रकार आयोगाच्या निदर्शनास आले असतील. त्यामुळे आयोगाने योग्य कारवाई करावी. 

भाजपकडून पैशाचा वाटप - संजय राऊत

कसब्यात काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भाजपने पोलिसांच्या मदतीने मतदार संघात पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात गेल्या अनेक वेळा पोलिसांच्या मदतीने निवडणुकीत पैसे वाटल्या जातात. मागच्या निवडणुकीत बारामती, पुणे भागात पोलिसांच्या गाडीतून कसे पैसे वाटले, हे पुराव्यासह उघड झालं आहे. पोलिसच राजकीय एजंट बनून पैसे वाटतात. भाजपकडून पोलिसांच्या गाड्यांमध्ये पैशांची देवाण-घेवाण झाल्याचे उघड झाले आहे. 

टॅग्स :Dhiraj Deshmukh