

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सोलापुरात ऊसदराबाबत आंदोलन सुरु केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात हे आंदोलन सुरु आहे. दुसरीकडे धाराशिवमध्ये संघटनेने धुळे-सोलापूर महामार्ग रोखून धरला आहे. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गावर १५ ते २० किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत.