

पुणे : ‘‘स्त्री शिक्षणाची पहिली शाळा महात्मा फुले यांनी नव्हे, तर थोरले प्रतापसिंह महाराज यांनी साताऱ्याच्या स्वत:च्या राजवाड्यात सुरू केली. याच राजवाड्यात देशाचे संविधान लिहिणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर महात्मा फुले यांनी थोरले प्रतापसिंह महाराज यांचे अनुकरण करत स्त्री शिक्षणाची शाळा सुरू केली,’’ असा दावा खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी केला.